मी ही वर्ल्डकप ट्रॉफी.”, गौतम गंभीरने T20 WC ट्रॉफी ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंना केली समर्पित


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अजून एका आयसीसी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. टी-२० विश्वचषकापूर्वी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं जेतेपद आपल्या नावे केलं होतं.

यानंतर आता भारताने टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद घरच्या मैदानावर आपल्या नावे करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. टीम इंडिया सलग दुसरं टी-२० वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा पहिला संघ आहे. संघाचं आणि कर्णधाराचं कौतुक केल्यानंतर गंभीरने ही ट्रॉफी ३ दिग्गजांना समर्पित केली आहे.

 

राहुल द्रविड यांचा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. गौतम गंभीरला कोच म्हणून बऱ्याच चढउतारांना सामोरं जावं लागलं. अनेक रेकॉर्ड तुटले, तर अनेक नवे विश्वविक्रमही घडले. गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही आयसीसी ट्रॉफी पटकावली होती. दरम्यान गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव या कोच-कॅप्टन जोडीच्या कार्यकाळात भारताने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. टी-२० विश्वचषकात संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेत टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली.

कोच गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिल्यांदा घरच्या मैदानावर वनडे आणि कसोटी मालिका गमावली. त्यानंतर गौतम गंभीर म्हणून कोचच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. पण बीसीसीआय आणि बोर्डाचे माजी अध्यक्ष जय शाह यांनी दाखवलेला विश्वास तसेच सर्वांचा पाठिंबा मिळवत गौतम गंभीर हे वर्ल्डकप विनिंग कोच ठरले आहेत. गौतम गंभीर आता खेळाडू म्हणून आणि आता कोच म्हणून वर्ल्डकप जिंकणारे भारतीय आहेत. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत भारताच्या ३ माजी दिग्गज खेळाडूंचे आभार मानत त्यांना ही वर्ल्डकप ट्रॉफी समर्पित केली.

गौतम गंभीर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “मी ही ट्रॉफी राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व अजित आगरकर यांना समर्पित करतो. राहुल द्रविडला कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्याप्रकारे संघ घडवला आहे. लक्ष्मण यांना कारण त्यांनी पडद्यामागून भारतीय क्रिकेटसाठी जे अनकंडिशनल कष्ट घेतले आहेत. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स हे टीम इंडियासाठी पाईपलाईन राहिली आहे आणि अजित आगरकर कारण ज्या प्रामाणिकपणे त्यांनी आपलं काम केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जय शाह. जय शाह हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्या कार्यकाळातील पडत्या वेळेत मला कॉल करून माझ्याशी संपर्क साधला होता.”

कोच गौतम गंभीरसाठी पुढील असाईनमेंट २०२७ मधील वनडे विश्वचषक असणार आहे. जो दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. भारतीय संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यासाठी हा अखेरचा विश्वचषक असण्याची शक्यता आहे, ज्यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केली.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!