मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर


संपादक – गणेश जाधव

राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. मात्र आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे.

सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने मतदानाच्या दोन दिवसापूर्वी राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. परंतु सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे. अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

आज मतदान अन् निकाल थेट 21 डिसेंबरला

डिसेंबरला याबाबतचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज मतदान झाल्यानंतर त्याचे निकाल थेट 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

त्यानुसार, 20 डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!