पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळी, विवाहित महिलेची आत्महत्या, लग्नानंतर 8 महिन्यातच स्वतःला संपवलं..


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुण्यात पुन्हा विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर आठ महिन्यात तरुणीने जीवन संपवलं आहे. पुण्यात आणखीन एका वैष्णवी ने सासरच्या लोकांना कंटाळून जीवन संपवलं आहे.

लोणीकंद परिसरातील ही घटना आहे. वैष्णवी जामकर अस आत्महत्या केलेल्या विवाहीत तरुणीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून छळ करत सतत पैशाची मागणी होत असल्यामुळे तरुणीने जीवन संपवलं आहे.

घरातच ओढणीने गळफास घेत वैष्णवी जामकरने आत्महत्या केली. 8 महिन्यांपूर्वी वैष्णवीचं लग्न झालं होतं. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी वैष्णवी यांचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात याआधीही वैष्णवी हगवणे यांचे अशाच प्रकारचे हुंडाबळी प्रकरण गाजले होते, त्यामुळे या नवीन घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडा प्रथेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!