सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 20 जूनला होणार लग्न


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा शुभविवाह २० जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका नामांकित ठिकाणी अत्यंत शाही थाटात पार पडणार आहे. या लग्नासाठी पवार कुटुंबीय आणि लखानी कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.केवळ विवाहसोहळाच नव्हे, तर लग्नानंतरचे रिसेप्शन (स्वागत सोहळा) देखील अत्यंत भव्य असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मुंबईत पहिला स्वागत सोहळा होईल. वरपक्ष नागपूरचा असल्याने तिथेही एका विशेष रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान लक्षात घेता, दिल्लीतही एक भव्य रिसेप्शन पार पडणार आहे.

सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!