बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थेतील घटना


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळल्याने एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पुण्यात इंदुरीतील तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये घडली. विशाल शर्मा असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घनटेनंतर विद्यार्थी आक्रमक झाले असून, प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंदुरी येथील तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्युटमध्ये विशाल शर्मा हा विद्यार्थी द्वितीय वर्षात शिकत होता. रविवारी विशालच्या अंगावर बास्केटबॉलचा स्टँड कोसळला. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ तळेगाव येथील मायमर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल पुढील तपास सुरू केला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!