मातृत्वाला काळीमा! आईनेच घेतला लेकराचा जीव, चौकशीत धक्कादायक खुलासा


पुण्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे आईनेच स्वत:च्या पोटच्या ११ महिन्यांच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसरे लग्न करण्याचा विचार असताना मुलगा आड येत असल्याच्या कारणावरून आईनेच टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आलं आहे.

पूजा पवार असे आरोपी आईचे नाव आहे. पूजाने मुलगा यश पवार (११ महिने) याला निर्घृणपणे संपवलं. मुलगा सतत रडायचा. त्यात आरोपीला पूजाला दुसरे लग्न करायचे होते. मात्र लग्नात मुलाचा अडथळा ठरेल, या विकृत विचारातून आईनेच लेकाचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.

आरोपी आईने मुलाचे डोके घरासमोरील सिमेंट ओट्यावर आपटून त्याची हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त धुवून टाकत त्याचा मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरला. त्यानंतर त्या बॅगेत दगड टाकले. शेतातील विहिरीत फेकून दिले. आईने मायेचा संबंध विसरून स्वत:च्या स्वार्थासाठी पोटच्या लेकाची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!