अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! SIT ची 15 मिनिटांत पत्रकार परिषद, तेजस्वी सातपुते यांचे धक्कादायक गौप्यस्फोट


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) तपास करत आहे. दरम्यान तपास सध्या कुठपर्यंत पोहोचला आहे याची माहिती एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी तपास कोणत्या दिशेने सुरु आहे याची माहिती दिली. पण त्यांनी अद्यापही तपास सुरु असल्याने तसंच प्रकरण संवेदनशील असल्याने सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. फक्त 15 मिनिटातच त्यांनी पत्रकार परिषद थांबवली. नेमकं त्यांनी काय सांगितलं जाणून घ्या.

11 गुन्ह्यांचा एसआयटीकडून तपास

“पोलीस महासंचालकांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याचा आदेश दिल्याने 20 मार्चपासून या व इतर 10 अशा एकूण 11 गुन्ह्यांचा एसआयटी तपास करत आहे. या पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे 24 जणांचे पथक आहे,” अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.

पुढे त्यांनी सांगितलं की, “अशोक खरातविरोधात नाशिक आणि नगर येथे मिळून 12 गुन्हे दाखल असून, 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. एका गुन्ह्याचा तपास नाशिक आणि दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरोधात नसलेल्या, पण विषयाशी संबंधित 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटी करत आहे”.

30 पेक्षा जास्त जणांची साक्ष

“महिला लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे आणि फसवणूक, अंधश्रद्धा यासंदर्भातील एका गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे. 30 पेक्षा जास्त जणांची साक्ष नोंदवली आहे. आरोपी पीडित कुटुंबाच्या अंधश्रद्धेचा गैऱफायदा घेत, भीती दाखवत, खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा , विधी याच्या माध्यमातून पैसे उकळत होता. तसंच महिलांना दैवी शक्त्ती असल्याचं भासवून, कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून लैंगिक शोषण करत होता. तसंच ईशान्येश्वर मंदिरात अंदारात हातचालाखीने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता,” असंही त्यांनी सांगितलं.

‘4650 लिंक डिलीट केल्या’

पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे. न्यायालयानेही ही भूमिका मांडली आहे. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे त्या लिंक हटवण्याचा आदेश दिला आहे. अत्याचाराच्या पीडितेची ओळख करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते सांगत त्यांनी कलमं वाचून दाखवली

“एसआयटीकडे असणाऱ्या गुन्ह्यातील पीडितांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या 4650 हजार लिंक्स सायबर टीमने डिलीट केल्या आहेत. तसंच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या 451 अकाऊंटना कायमस्वरुपी बंद केलं आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हेही दाखल झाले आहेत. आजपर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

एसआयटीकडील तपास संवेदनशील असल्याने अधिक माहिती देऊ शकत नाही सांगत त्यांनी जास्त माहिती देण्यास नकरा दिला. गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत दोषारोपत्र दाखल करणं गरजेचं असतं. 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला. 20 तारखेला एसआयटीकडे तपास आला. सर्व गुन्ह्यांची डेडलाइन संपत आहे असंही त्यांनी सांगितलं.

दाखल गुन्ह्यात फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे तपास होता. पुराव्याच्या आधारे पुढील तपास होतो. त्यानुसार संबधित आणि सह-आरोपींवर कारवाई होते. कोणी मदत केली आहे का हे तपासात समोर आढळल्यास कारवाई केली जाईल. तपास अजून सुरु आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत गोपनीयात बाळगावी लागणार आहे असं त्या म्हणाल्या.

पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत. खरातच्या आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टी याची ईडीने दखल गेतली आहे. आम्ही त्यांना सर्व माहिती पुरवली आहे. भविष्यातही त्यांना सहकार्य केलं जाईल असं सांगताना त्यांनी भविष्यात महिलांचा लैंगिक शोषण होऊ नये, भोंदूंना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!