संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
पुणे – सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला आहे. अनेकजण कडक उन्हापासून थंडावा मिळवण्यासाठी वॉटरपार्कला पंसती देतात. यामुळे मुंबई प्रमाणे पुण्यातील वॉटरपार्कमध्ये देखील पर्यटकांची गर्दी होत आहे.
अशातच पुण्यातील प्रसिद्ध वॉटपार्कमध्ये भयानक दुर्घटना घडली आहे. वॉटर स्लाइडवरुन स्लायडिंग करणाऱ्या पर्यटक महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच वॉटरपार्कच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यातीस एका प्रसिद्ध वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात झाला. यात महिलेचे अर्धे शरीर निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वॉटरपार्क प्रशासनाविरोधात शिरुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वॉटरपार्कचा पंचनामा केला आहे.
अश्विनी संदीप नप्ते (वय 37) असे अपघाता ग्रस्त महिसेले नाव आहे. अश्विनी या करंदी येथे राहणाऱ्या आहे. अश्विनी या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.
तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वॉटर पार्कमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला
काही दिवसांपूर्वी नागपूरच्या क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. 21 वर्षांचा सागर सहस्त्रबुद्धे आणि 19 वर्षांचा अक्षय बिंड यांचा मृत्यू झाला. तर नेहल मोटघरे हा २१ वर्षांचा तरुण अत्यवस्थ झाला होता. या वॉटर पार्कमध्ये ज्या ठिकाणी कृत्रिम लाटा तयार केल्या जातात, तिथे हे तिघेही खेळत होते. तिथेच या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले.. धक्कादायक बाब म्हणजे वॉटर पार्क मध्ये ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ही दुपारी चार वाजेपर्यंत वॉटर पार्क आणि घटना घडलेले पूल तसेच सुरु ठेवण्यात आले होते.









