बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण


बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी माघार घेऊनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही.

त्यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोध न होण्याचे कारण सांगितले आहे.

बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सहकार्य केलेलेच आहे. ज्यांनी बिनविरोधसाठी सहकार्य केले नाही, ते केवळ आपलं नावं माध्यमांमध्ये छापून आलं पाहिजे, थोडी प्रसिद्धी मिळाली पाहिजे, यासाठी ही मंडळी उभी आहेत. पण ठीक आहे.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संपूर्ण काळजी महाराष्ट्राचे पोलिस खाते घेईल. आपल्या पोलिसांनी यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे जे पत्र आले आहे, त्याची चौकशी करण्यात येईल. तसेच, योग्य सुरक्षाही त्यांना देण्यात आलेली आहेच, असे उत्तर फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याच्या प्रश्नावर दिले.

 

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!