अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर! कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू


कल्याण – मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधलेल्या रायता पुलावर सोमवारी प्रवाशांची वाहतूक करणारी इको टॅक्सी आणि सीमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात टॅक्सीचालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात एवढा भीषण होता की टॅक्सीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अपघातग्रस्त सहा आसनी टॅक्सीत ११ प्रवासी कोंबले होते. ते अवैध वाहतुकीचे बळी ठरले.

ग्रामस्थांनी तातडीने अपघातग्रस्तांना गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक फरार झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल लाड यांनी दिली.

अपघातात दिवा (ठाणे) येथील मोहपे कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी व भावाचा मृत्यू झाला. ते त्यांच्या काकाच्या मुलाच्या हळदी समारंभासाठी पर्हे गावात जात होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला कोणाचा आधार राहिला नाही.

मृतांची नावे

टॅक्सी चालक प्रशांत ऊर्फ बबलू चंदने (२१, देवगाव, मुरबाड), भूषण घोरपडे (४४, अंधेरी), जिजा केंबारी (५०, टेंभरे, मुरबाड), अनंता पवार (साखरे, मुरबाड), दीपक गवळी (कल्याण), गणपत मधे (३२, देवराळवाडी, मुरबाड), नेहा मोहपे, (२२, दिवा), मानसी मोहपे (२०, दिवा), प्रथमेश मोहपे (१७, दिवा), रिंकू लोधी ( ४०, मध्य प्रदेश), गणेश गुरव (४०, कुर्ला).

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!