बारामती पोटनिवडणूक: प्रचाराला वेग, रोहित पवारांकडून ‘घोंगडी बैठकीं’ ची सुरुवात


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती -(15 एप्रिल) महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामती पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी विशेष ‘घोंगडी बैठकीं’ची मालिका सुरू केली आहे.

प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातून करण्यात आला. या बैठकीत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि भगिनी सई पवार यांचीही उपस्थिती होती.

पुढील तीन दिवस बारामतीत विविध ठिकाणी अशाच घोंगडी बैठका आणि प्रचार सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बारामतीत कुटुंबीय नातेसंबंध आणि राजकीय साथ यांचे वेगळे चित्र पाहायला मिळत असून, निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!