मोठी बातमी..! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं? इंस्टाग्रामवर पोस्ट करत केला मोठा खुलासा.


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

भारताची स्टार फलंदाज स्मृची मानधना आणि पलाश मुच्छल दोघेही विवाह बंधनात अडकणार होते. २३ नोव्हेंबरला सांगलीत दोघांचा विवाह होणार होता.पण विवाह होण्याच्या काही तासांआधीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडली, त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्यांवरून बऱ्याच चर्चा रंगल्या. कुटुंबियातील सदस्यांनी या अफवा असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर गेल्या २ आठवड्यांपासून स्मृती आणि पलाश सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर होते. अखेर ७ डिसेंबरला स्मृती मानधनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करून हे लग्न मोडलं असल्याची माहिती दिली. दरम्यान स्मृतीने पोस्ट शेअर केल्यानंतर पलाशनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्मृतीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘ गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. मला तरी हेच वाटतं की मी यावेळी याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. मी अतिशय खाजगी व्यक्ती आहे. परंतु मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे.’

तसेच तिने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘हे प्रकरण मला इथेच संपवायचं आहे. मला तुम्हालाही विनंती करायची आहे की, यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनियतेचा आदर करा. आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ द्या. सर्वांसमोर काही ना काही उद्दिष्ट असतं आणि माझ्यासमोर हेच उद्दिष्ट आहे की, मी सर्वोच्च स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करावं. माझं हेच ध्येय आहे की, मी देशासाठी खेळत राहावं आणि शक्य तितकी जेतेपद जिंकत राहावं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. इथून पुढे जाण्याची वेळ आली आहे.’


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!