इंडिगो मुळे नवविवाहित जोडप्याचं ऑनलाईन रिसेप्शन


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांचे गेल्या 3-4 दिवसांपासून हाल सुरू आहेत. इंडिगोची अनेक विमाने रद्द झाली आहेत, तर काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.विमानसेवा कोलमडल्याने अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

अशातच आता इंडिगोच्या या भोंगळ कारभारामुळे अनेक लोकांना नियोजित कार्यक्रमांना हजर राहता आलेले नाही. एक नव विवाहित जोडपं आपल्याच रिसेप्शनला हजर राहू शकलेले नाही. विमानांमध्ये वैमानिकांची कमतरता असल्याने देशभरातील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका एका नव विवाहित जोडप्याला बसला आहे. इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट रद्द झाल्यामुळे वधू-वर येऊ शकले नाहीत म्हणून त्यांना रिसेप्शनला ऑनलाइन हजर रहावे लागले. हुबळी येथील गुजरात भवनमध्ये ही घटना घडली.हुबळी येथील मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वर येथील संगमा दास हे बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. या जोडप्याने 23 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये लग्न केले. गेल्या बुधवारी वधूचे मूळ गाव हुबळी येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.

कुटुंबाने हुबळी येथील गुजरात भवनमध्ये यासाठी सर्व तयारी केली होती.वधू-वरांनी 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बंगळुरूवरून हुबळीला जाण्यासाठी विमान बुक केले होते. 2 डिसेंबर रोजी विमान लेट आणि 3 डिसेंबरला पहाटे 4-5 वाजेपर्यंत विमान उशिरा सुरू झाले. त्यामुळे हे जोडपं पोहोचू शकलं नाही. त्यामुळे या रिसेप्शन कार्यक्रमाला वधू वर ऑनलाइन (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) सहभागी झाले होते.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!