Gold Rate Today: आजचा सोन्याचा भाव, 22 ऑगस्ट: सोनं-चांदी खरेदीदारांना मोठा धक्का! भाव थेट गगनाला भिडले…!


संपादक- गणेश जाधव, उपसंपादक- रोहित माने.

दि.२२ ऑगस्ट २०२६.

Gold Price Today, 24k 22k 18k Sonyacha Bhav: सोने-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

एक किलो चांदीचा भाव 8864 रुपयांनी वाढून 2.46 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 3540 रुपयांची वाढ होऊन ते थेट 1.60 लाख रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.

या वर्षात सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.33 लाख रुपये होता, जो आता वाढून 1.60 लाख रुपयांवर आला आहे. म्हणजेच यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याच काळात, 29 जानेवारी रोजी सोन्याने 1.76 लाख रुपये आणि चांदीने 3.86 लाख रुपयांचा ऑल-टाईम हाय देखील नोंदवला होता.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याला सामान्य गुंतवणूकदारांसोबतच आरबीआयसह (RBI) जगभरातील मध्यवर्ती बँकांचे मोठे समर्थन मिळत आहे, ज्यामुळे सोन्याची सतत खरेदी होत आहे. आगामी काळात जागतिक पातळीवर कठीण परिस्थिती राहिली तरीही सोन्यातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारल्यास चांदीमध्येही मोठी वाढ दिसू शकते.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चालू वर्षाच्या डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 1.70 लाख रुपयांपर्यंत आणि चांदीची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. जागतिक आर्थिक घडामोडी आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांमुळे येत्या काळात मौल्यवान धातूंच्या बाजारावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शनिवारी (22 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,620 रुपये आहे.

IBJA नुसार, आजचा सोन्याचा दर खालीलप्रमाणे (Gold Rate Today in Marathi)

कॅरेटनुसार सोने आजचा सोन्याचा दर

सोने 24 कॅरेट 160620 प्रति 10 ग्रॅम

सोने 22 कॅरेट 159977 प्रति 10 ग्रॅम

सोने 20 कॅरेट 147128 प्रति 10 ग्रॅम

सोने 18 कॅरेट 120465 प्रति 10 ग्रॅम

सोने 14 कॅरेट 93963 प्रति 10 ग्रॅम

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (24 Carat Gold Rate Today)

शहराचे नाव आजचा सोन्याचा दर (प्रति10 ग्रॅम)

मुंबई = 160620

ठाणे =160620

रत्नागिरी = 160620

पुणे = 160620

नागपूर = 160620

कोल्हापूर = 160620

छत्रपती संभाजीनगर = 160620

जळगाव = 160620

सांगली = 160620

बारामती = 160620

चांदीचा भाव काय?

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, , शनिवारी (22 ऑगस्ट) चांदीचा दर 2,46,630 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!