Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला एकटं पाडलं, सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकलं; म्हणाल्या, ‘अजितदादांनी 300 कोटी…!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.२३ ऑगस्ट २०२६.

Sunetra Pawar News : बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकटे पाडण्यात आले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरण्यात असून व्हिडिओद्वारे त्यांनी या निवडणुकीच्या मैदानात पॅनले उतरवल्याची माहिती दिली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘बुलढाणा जिल्ह्यातील मोठे नेते अजितदादांकडे यायचे आणि आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे. शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी म्हणून ३०० कोटी रुपयांची मदत दादांनी केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आल्याची पाहायले मिळाले. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर पक्षांना सोबत घेतले, याची मला आता खंत वाटते.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘नेते दादांकडे आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे. ते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे. कारण अनेकवेळा मी दादांसोबत असायची त्यावेळी सुद्धा हा विषय मी ऐकत असायचे.’

ज्या बँकेला दादांनी भरीव मदत केली, त्यांच्याच पक्षाला बाजुला ठेवण्याचे काम त्यांनी केली. त्यामुळे अजितदादांच्या नावाने स्व.अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावाने आपण पॅनल उभं केलं आहे.’

DCC Bank : जिल्हा बँकेत भाजप-शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा ‘गेम’ : अजितदादांनी दिलेल्या 350 कोटींची आठवण करून देत मकरंदआबांचा संताप

आज मतदान

बँकेच्या 21 संचालकांपैकी 12 संचालक बिनविरोध करण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादीला यामध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार मनोज कायंदे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीकडून स्व.अजितदादा पवार शेतकरी पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आला आहे. उर्वरीत 9 जागांवर या पॅनलची लढत ‘सहकार पॅनल’सोबत होणार आहे.आज रविवारी (ता.23) या निवडणुकीचे मतदान होत आहे


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!