संपादक- गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.२३ ऑगस्ट २०२६.
सध्या सोनं चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किमतीत या महिन्यात आतापर्यंत तब्बल १९००० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दरात सलग पाचव्या आठवड्यात तेजी नोंदवण्यात आली आहे.
त्यामुळे आता सोन्याचा भाव पुन्हा वाढलेला पाहायला मिळत आहे.
एका आठवड्यात सोनं ८ हजारांनी महागलं
MCX वर गेल्या काही आठवड्यात सोन्याच्या किंमतीत ८ हजार रुपये १० ग्रॅमची वाढ झाली. त्यानंतर सोन्याचा भाव १,६२,४३८ रुपये १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे १३.३० टक्के म्हणजेच १९ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
२०२६ मध्ये आत्तापर्यंत सोन्याच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ झालेली आहेय. याच वाढत्या किमतीमुळे सोन्याने याआधी झालेली घसरण भरून काढली असून, तो १,८०,७७९ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे.
सोन्यासोबत चांदीच्या किमतीतही जोरदार वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव १०,६७३ रुपयांनी वाढून २,४८,१२४ रुपये प्रति किलो झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे लक्ष आता चांदीच्या दराकडेही लागलं आहे. सोन्याच्या दरातली तेजीमागे अमेरिकन डॉलरची कमजोरी हे महत्त्वाचं कारण मानलं आहे. डॉलरचा दर सध्या जवळपास तीन महिन्यात घसरला म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे.









