कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार..!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.२४ सप्टेंबर २०२६.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार असून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज बारामती उपविभागातील पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

आज दुपारी एक वाजता ते बारामती तालुक्यातील मोरगाव आणि मुर्टी या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करणार आहेत.

नंतर ते पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे व नावळी या गावातील पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर्व भागातील इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर या चार तालुक्यांमध्ये या संपूर्ण पावसाळ्यात अतिशय कमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमुळे पिके जळून गेली आहेत.

यावर्षी मोठा दुष्काळ शेतकऱ्यांना पाहण्याची वेळ येणार असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून या तालुक्यांचा समावेश गंभीर दुष्काळी परिस्थितीमध्ये करावा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज बारामती दौंड आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!