कारमधून अपहरण करून हत्या ; फुरसुंगी पोलिसांकडून २ तासांत आरोपी अटकेत


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना फुरसुंगी परिसरात घडली असून, फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुण हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने आपल्या साथीदारांसह हा धक्कादायक प्रकार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात किरण भैरू चव्हाण (वय ३२) आणि रोहित भरत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा एक अल्पवयीन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.

मृत तरुणाचं नाव प्रसाद वीरभद्र देवज्ञे असं आहे. मंगळवारी दुपारी आरोपींनी प्रसादला काळेपडळ परिसरातून कारमध्ये बसवून फुरसुंगी येथील एका निर्जन भागात नेलं. तिथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण आणि प्रसाद यांच्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वाद सुरू होता. याचाच बदला घेण्यासाठी किरणने हा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.घटनेची माहिती मिळताच उपायुक्त पोलीस डॉ. राजकुमार शिंदे आणि एसपी अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!