संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.२१ ऑगस्ट २०२६.
बारामती – तालुक्यातील कन्हेरी नजिक पुलाजवळ महामार्गावर हायवा चालकाने अचानक लेन बदलल्याने झालेल्या अपघातात अर्जुन अनिल विटकर (वय-२६, रा. लिमटेक, ता. बारामती) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र इंद्रजित विठ्ठल खंडाळे (रा.लिमटेक, ता. बारामती) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता हायवा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात गुरुवारी (ता. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास कण्हेरी येथील सावळ पुलाजवळ महामार्गावर घडला. याप्रकरणी अमन सुनील विटकर (वय २८, व्यवसाय चालक, रा. लिमटेक, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायवा क्रमांक एमएच ४५-१२४७ च्या अज्ञात चालकाने अचानक लेन बदलून समोर आल्याने अर्जुन विटकर व इंद्रजित खंडाळे यांच्या एमएच ४२ एएल ९७४० क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक बसली. या अपघातात अर्जुन विटकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच इंद्रजित खंडाळे यांना गंभीर दुखापत झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.