संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – भारतीय जनता पक्षाबाबत करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवमानकारक विधानांचा निषेध, बारामती तालुक्यातील वाढती राजकीय मक्तेदारी आणि तथाकथित ‘मलिदा गँग’च्या कारभाराविरोधात सोमवारी (ता.5) भारतीय जनता पक्षाच्या बारामती शहर व तालुका संघटनेच्या वतीने ‘जनक्षोभ मोर्चा’ काढण्यात आला.
अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख “राक्षसी भूक” असा केल्याच्या आरोपावरून, त्या विधानाचा तीव्र निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान “बकासुराचे नैवेद्य ताट” दाखवून जाहीर निषेध केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
आंदोलनानंतर प्रशासनाला निवेदन देत अजित पवार यांनी जाहीर माफी मागावी, बारामती परिसरातील पवारांशी संबंधित कथित जमीन व्यवहारांमध्ये बाजारमूल्य कोट्यवधी असतानाही नोंदणीवेळी अत्यल्प किमती दाखवून महसूल बुडवल्याचा संशय असून, या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी, टेंडर प्रक्रिया व शासकीय कंत्राटांतील कथित गैरप्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फ चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
ॲड. नितीन भामे, नवनाथ पडळकर, सतीश फाळके, ॲड. आकाश दामोदरे, ॲड. अक्षय गायकवाड, रघु चौधर, अल्ताफ बागवान, अजित जाधव, अभिजीत पवार, उमेश गायकवाड, ओंकार साठे, महेश नेटके, बाळासाहेब गार्डी, विवेक साळुंखे, रोहित शिंदे, अमोल प्रभुणे, संतोष सरोदे, ओंकार एकशिंगे, सुजित वायसे, शहाजी कदम, मुकेश वाघेला, प्रमोद डिंबळे, संगीता दामोदरे, ॲड. माया खुंटे, सौ. गौरी एकशिंगे, सुनिता शिंदे, प्रियांका साळुंखे, कांता गार्डी, इंदुबाई चौधर, सुवर्णा जगताप, संतोष जाधव, फिरोज तांबोळी, साजन अडसुळ, चंद्रकांत सरोदे आदी उपस्थित होते.









