जय पाटील यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा.


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. कार्यकाळ संपल्याने व नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यामुळे जय पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बारामती शहराचा कारभारी कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

शहराध्यक्ष पदाची धुरा हातात येताच जय पाटील यांनी शहरात कामाचा झंजावात सुरू ठेवला होता. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कामाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. युवकांचे संघटन मजबूत करत पक्षाला बळ देण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो बाटल्या रक्त संकलित करण्याचे काम केले. यातून शहरातील युवक आरोग्य सेवेत जोडले.रक्तदान शिबिराबरोबरच शहरात आरोग्य शिबिरे घेतली. त्याला बारामतीकरांनी प्रतिसाद दिला. पाटील हे शहराध्यक्ष झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत त्यांनी राष्ट्रवादी शहर कार्यालय नव्याने बांधले.

त्यामुळे शहरात पक्ष संघटनेला उर्जितावस्था प्राप्त झाली. लोकसभा विधानसभेवेळी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविला. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या दाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढण्यास मदत झाली.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राष्ट्रवादीने पुन्हा हा उपक्रम राबविला. त्यामध्ये प्रभाग दौरे झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामती शहरात झालेली विकास कामे व भविष्यातील व्हिजन नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली.

जय पाटील यांचे संघटन दखलपात्र

लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर व तालुक्यातील कार्यकारणी बदलण्याचा घाट घातला गेला त्यानंतर देखील जय पाटील यांच्यावर अजित पवार यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवली. शहराध्यक्ष म्हणून जय पाटील यांनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी अनेक अनेक वेळा केला.

असे असले तरी देखील कार्यकाळ संपल्याने व नगरसेवकपदी निवड झाल्याने जय पाटील यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले. संघटनेमध्ये काम करताना विद्यार्थी, युवकांनी महिला पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. त्याबद्दल जय पाटील यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!