संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – २६ जानेवारी २०२६ रोजी (सोमवार) बारामती नगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न झाल्याची बाब समोर आली. या प्रकारामुळे अनेक नागरिक, संविधानप्रेमी तसेच सामाजिक संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेध करत नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संतप्त कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकून आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. याबाबत आता नगराध्यक्ष सचिन सातव यांनी स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणाले की आपण सर्व व अवघा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिवस, धम्मचक्र परिवर्तन दिवस हे चार उत्सव साजरा करत असतो. या दिवशी त्यांना अभिवादन केले जाते. थोर समाजसुधारक, कायदेतज्ञ प.पु. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असलेले योगदान अमुल्य, अतुलनीय, अविश्वस्मरणीय, अजय आहे. त्यांच्यासारखा सामाजिक नेता या देशात न घडला, न घडणार.
वास्तविक पाहता बारामती नगरपरिषद २६ जानेवारी व १५ ऑगस्ट हे राष्ट्रीय सण साजरे करीत असताना संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन नेहमीच साजरे करीत असते व कालही ध्वज वंदनानंतर आपण सर्वांनी पुतळ्यास अभिवादन करुन २६ जानेवारीचा राष्ट्रीय सण साजरा केला.
आज माझ्याबाबतीत झालेली घटना काही लोकांच्या अज्ञानातून घडलेली आहे. माझी याबाबत कसलीही तक्रार नाही.
तरी माझी आपणास कळकळीचे अवाहन की, काही अविचारी लोकांच्या कृतीमुळे आपल्यातील सामाजिक सलोखा बिघडवू नये असा आव्हान त्यांनी केल.
या घटनेमुळे बारामतीत सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने यापुढे अशा संवेदनशील बाबींमध्ये अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेमुळे बारामतीत सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाने यापुढे अशा संवेदनशील बाबींमध्ये अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









