भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण.मध्यरात्री तरुणी बारामती पोलीस ठाण्यात हजर


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बहुचर्चित भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणी शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. सध्या ती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड यांनी दिली.

भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा भिगवण पोलिसांत दाखल झाला होता. या प्रकरणात जहीर शेख व आयान शेख या दोघा भावांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकऱणामुळे भिगवणमध्ये मोठी खळबळ उडाली होती. हिंदूत्ववादी संघटनांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान या तरुणीचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेला अचानक कलाटणी मिळाली होती. या व्हिडीअोमध्ये तिने मी स्वतःहून संबंधित तरुणासोबत आल्याचे सांगत माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माझे गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले होते. तरीही आक्रमक संघटनांनी तिला हजर करा, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे केली होती. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता.

घटनेनंतर हे जोडपे श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड मार्गे महाबळेश्वरला गेले होते. तेथून ते बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले.तरुणीने स्वत: च्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब बारामती पोलीस ठाण्यात हजर होत दिला आहे. तसेच घटनेच्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलेलं याबाबतची माहिती पोलिसांना तरुणीने दिली आहे. मंगळवारी मुलगी प्रियकरासोबत श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करुन महाबळेश्वरला गेली. यानंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत काल मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली असून मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तर दुसरीकडे आरोपींनी मुलीच्या आई आणि भावावर कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!