बारामती तालुक्यातील ‘या’ गावाने दिली बंदची हाक; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत केली मोठी मागणी


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद व्यक्त केला होता.

हा दावा करताना त्यांनी यावर सविस्तर माहित देत धक्कदायक खुलासे केले होते.

नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी थेट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीमान्याची मागणी केली आहे. अशातच आता बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने गाव बंदची हाक दिली आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी लोणी भापकर गावातील ग्रामपंचायतीत ठराव करून यासंबंधीचे पत्र पोलीस निरीक्षकांना लिहिले आहे. त्यानुसार हे गाव रविवारी बंद असणार असणार आहे.

पत्रामध्ये अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहत आम्हाला अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय असल्याचे म्हटले असून, या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. गावातील सर्व गावकरी संघटना आदी सर्वच जण बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.

२८ जानेवारीला महाराष्ट्रला हादरवणारी दुर्देवी घटना घडली. अजित पवार विमानाने बारामतीकडे येत असताना विमान अपघातात त्यांचे निधन झाले. या अपघातात विमानातील पाच जणांचे देखील निधन झाले. त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. २९ जानेवारीला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी बारामतीत मोठा जनसमुदाय उसळला होता. अजित पवार यांच्या जाण्याने बारामती पोरकी झाल्याची भावना आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!