संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राला लाज आणणारी संतापजनक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाल्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात मंगळवारी ही घटना घडलीय. मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अॅसिड फेकलं. अॅसिड फेकल्यानंतर आरोपी फरार झालाय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आलाय. जखमी मुलीवर लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी सुरु केलीय. अॅसिड हल्ला प्रकरणावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्याची घटना मंगळवारी घडली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे. जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेताय. घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. तर जखमी मुलीच्या चेहऱ्यावर आज प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
भाजपची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या चित्रा वाघ
संगमनेरमध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. मुलीच्या कुटुंबियांसोबत बोलणं झाल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितले. शासनाकडून सर्वोत्तम वैद्यकीय मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितलं. कुटुंबासोबत बोलणं झालं असून सर्वतोपरी सहकार्याचा शब्द दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. त्याशिवाय आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथकं तैनात केल्याचेही त्यांनी सांगितलं.
तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. शासन कोणतीही तडजोड करणार नाही. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याकडून संबंधित यंत्रणांना सुचना दिल्या जात आहेत. महिलां व बालकांच्या सुरक्षेबाबत Zero Tolerance हीच आमची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितलं.









