संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
कॉस्मोलॉजी’ तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणारा आणि बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून अनेक आक्षेपार्ह पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिलेच्या तकारीनंतर सरकार वाडा पोलीस ठाण्यात ज्योतिष अशोक खरात विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान पोलिसांना खरात याच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स’ या कार्यालयाबद्दल धक्कादायक माहिती मिळाली. खरात याने आपल्या कार्यालयात छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये काही महिलांच्या व्हिडिओंचा समावेश आहे. महिलांना भुरळ पाडून, भविष्याची भीती दाखवून किंवा इतर आमिषे दाखवून तो त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.









