हिंजवडी IT पार्कमध्ये ‘काश्मीर’चा अनुभव! पुण्यात बर्फवृष्टीसारखा नजारा


पुणे (31 मार्च) :पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये सेम टू सेम काश्मिर सारखा नजारा पहायला मिळाला. पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामानात अचानक बदल झाला. दुपारी, कडक ऊन असताना अचानक आकाश ढगाळ झाले.

त्यानंतर सोसाट्याचा वारा, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. बाणेर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचे वादळ झाले. हिंजवडी IT पार्कमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली. याचे फोट आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

पुण्याच्या हवामनात अचानक झालेल्या या बदलामुळे रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पण या अचानक बदलामुळे लोकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने अशा बदलाचा अंदाज आधीच वर्तवला होता. दुपारी हवामान अचानक बदलले. सकाळपासून पुण्यात प्रचंड उकाडा होता आणि लोक उष्णतेने त्रस्त होते. मात्र, दुपारपर्यंत हवामानात अचानक बदल झाला. दुपारी 3 च्या सुमारास आकाश ढगाळ झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि पाषाण यांसारख्या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. बाणेर आणि बालेवाडीमध्ये गारपीटही झाली, त्यामुळे काही काळ रस्त्यांवर बर्फाचा पांढरा थर साचला होता. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला. तापमानात क्षणिक घट झाली आणि हवामान थंड झाले. तथापि, वाढलेल्या आर्द्रतेमुळे संध्याकाळपर्यंत उष्णता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अचानक पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांसाठी समस्या ठरू शकते. आंबा आणि इतर पिकांचे, विशेषतः आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

शेतकरी हवालदिल

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता. भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला.

 

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!