अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, शरद पवारांनी काँग्रेसला दिला महत्त्वाचा सल्ला


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज  दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध काँग्रेससह ५० हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

त्यामुळे काँग्रेस अर्ज माघारी घेणार का? ही निवडणूक बिनविरोध होणार का? हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) शरद पवार यांनी काँग्रेसला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

बारामतीची निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. पण, हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही काय त्यांना सांगू शकत नाही. पण, बारामतीची जागा अजित पवारांचे अपघातात निधन झाल्यामुळे रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातील एक कर्तृत्त्ववान प्रतिनिधी गेला आहे. मला विचारले, तर मी काँग्रेसला सल्ला देईल की, यापार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.” असं शरद पवार म्हटले आहेत..

एकूणच बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागला आहे .

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!