हरियाणाच्या पानीपतमध्ये राहणाऱ्या सायको आंटीची थरकाप उडवणारी काहाणी ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. दिसायला साधी, नेहमीच स्मित हास्य करणारी पुनम. परंतु तिच्या हसऱ्या चेहऱ्यामगची लपलेली वाईट वृत्ती कोणालाच कळली नाही.
तिच्या मनात होता तो केवळ खुनखाराबा. कुंटुंबात सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांवर ती जळायची, आणि रागाच्या भरात त्यांची हत्या करायची. आतापर्यंत तिने तब्बल चार निरागस मुलांचा बळी घेतला.
पोलिसांच्या चौकशीत पुनमने कबूल केलं की, ‘मला सुंदर लहान मुलं सहनच होतं नव्हती, त्यामुळे ते दिसले की, माझ्या मनात प्रचंड राग येयचा ‘ नंतर कालांतराने हा पुनमचा स्वभाव झाला. त्यानंतर तिने मुलांना मारुन टाकायचं ठरवलं.
पहिला खून पुनमने 2023 साली सोनीपतच्या बोहड गावात ननदेच्या लेकीचा केला. ननदेची छोटी मुलगी तिच्याकडे आली, तेव्हा पुनमने तिला गोड बोलून बाथरुममध्ये नेलं आणि तिथचं तिला पाण्यात बुडवून मारुन टाकलं. कुटुंबाला हा अपघात वाटला. परंतु पुनमच्या मनात वकृती कोणालाच कळली नाही.
पहिल्या हत्येनंतर पुनमला कोणाला संशय येईल याची भिती वाटत होती. संशय टाळण्यासाठी तिने पुन्हा स्वत:च्या 3 वर्षाच्या मुलालाही पाण्यात बुडवून मारुन टाकलं. तेव्हा पुनम खूप रडली. परंतु रडणारी पुनमच आपल्या पोटच्या गोळ्याचा खून करेल असं कोणालाच जाणवलं नाही.
तिसरा खून तिने 2025 मध्ये भावाच्या मुलीचा केला. भावाची मुलगी जीया ही प्रचंड सुंदर मुलगी होती. पुनमने तिला हौदाजवळ नेलं आणि पाण्यात दाबून मारून टाकलं. तिथेही कुटुंबाला तो अपघात वाटला. तो पुनमने केलेला खून होता हे कोणालाच कळालं नाही.
त्यानंतर 1 डिसेंबर 2025 मध्ये घरात लग्न होतं. सगळे आनंदात होते. तेव्हा पुनमची नजर तिच्या जावेच्या निरागस लेकीकडे गेली. तिला पाहताच पुनमच्या मनातील तिला मारायची इच्छा जागी झाली. छतावर खेळत असलेल्या त्या चिमुकलीकडे गेली आणि तिथचं टबमध्ये डोक बुडवून तिला मारुन टाकलं. परंतु टबमध्ये मुलीचा मृत्यू कसा होऊ शकतो याचा संशय घरच्यांना आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता बाथरुमजवळ फिरणारी एकच महिला दिसली. ती होती पुनम. त्यानंतर पोलिसांनी पुनमची चौकशी केली असता तिने तिच्या गुन्हाच्या कबुली दिली. कबुलीत ती हे सुद्धा म्हणाली की, जेव्हा ती त्या निष्पाप जीवाचा खुन करायची तेव्हा तिला खुप आनंद व्हायचा. दरम्यान आता पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.








