बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान! 478 मतदान केंद्रांची व्यवस्था


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – ( ता.23 )बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 23) मतदान होत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघातातील निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीची रंगत वाढली होती.

दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मात्र अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील थेट लढत टळली आणि वातावरण काहीसे शांत झाले. त्यांना महाविकास आघाडी, सामाजिक संघटना, अन्य पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अर्ज माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना (उबाठा), संपूर्ण पवार कुटुंबीय निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले होते. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगता सभा पार पडली आहे.

अजितदादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक भावनिक झाली असून गावांगावांतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. खासदार पार्थ पवार, जय पवार यांनी भेटीगाठीवर भर देत मतदारांशी संवाद साधला आहे. मतदारसंघात एकूण 3 लाख 84 हजार 579 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 93 हजार 871 पुरुष, 1 लाख 90 हजार 684 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

या मतदारांसाठी 478 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एकूण 96 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. पोटनिवडणुकीची मतमोजणी (दि.4) मे रोजी बारामती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसीत होणार आहे.

165 वाहनांची व्यवस्था

478 ईव्हीएम, 956 बॅलेट युनिट्स आणि 478 व्हीव्हीपॅट यंत्रे मतदान केंद्रांवर पाठवणार आहेत. 60 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, 120 बॅलेट युनिट्स राखीव आहेत. निवडणूक कामकाजासाठी 165 वाहनांची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय अधिकार्‍यांसाठी 60 वाहने, ईव्हीएम मशीन व साहित्य वाहतुकीसाठी 60 बंदिस्त मिनी टेम्पो आणि कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी 45 बसेसचा समावेश आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!