संपादक – गणेश जाधव , प्रतिनिधी – रोहित माने
बारामती शहरातील तिरंगा चौक येथे चारचाकी वाहनाच्या धडकेमुळे एक छोटासा खांब तुटल्याची घटना काल रात्री सुमारे ११.३० वाजता घडली. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिक ॲड. अक्षय गायकवाड यांनी तत्काळ सचिनशेठ सातव (नगराध्यक्ष – बारामती नगरपरिषद) यांना WhatsApp वर संदेश पाठवून माहिती दिली.
या संदेशाची दखल घेत नगराध्यक्षांनी त्वरित संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. आज सकाळी नेमके ११.३० वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचा प्रतिसाद त्यांनी दिला. अवघ्या १२ तासांच्या आत झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
तिरंगा चौक हा शहरातील नेहमीच वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता असल्याने अशा ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण होऊ शकत होता. मात्र, तात्काळ दुरुस्ती करून प्रशासनाने जबाबदारीची जाणीव दाखवली.
या पार्श्वभूमीवर ॲड. अक्षय गायकवाड यांनी नगराध्यक्षांचे आभार मानत, “काम करणाऱ्या माणसाचे कौतुक झालेच पाहिजे; जे चांगले आहे ते मनापासून मान्य केले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
बारामतीकरांना अशीच तत्पर आणि जबाबदार सेवा मिळत राहो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









