बारामतीत उद्योग भवनातील गाळे सील; थकबाकीदारांचे धाबे दणाणले


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती नगर परिषद घरपट्टी, पाणीपट्टी, जागा (गाळा) भाडे विभागांची वसुली मोहीम सुरू केली आहे. जागा भाडे विभागामार्फत जानेवारी २०२६ पासून थकबाकीदारांना पंधरा दिवसांच्या मुदतीची नोटीस वाटून थकीत रकमेचा भरणा करणे बाबत अवगत केले होते.

त्यानुसार पुन्हा अंतिम २४ तासांची नोटीस बजावून तसेच वेळोवेळी भेटी देऊन दुकानभाडे भरणे कामे अवगत केले होते.

तथापि त्यानंतरही गाळेधारकांकडून भरणा केला नसलेल्या गाळ्यांना सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. शुक्रवार (दि.२०) रोजी बारामती नगरपरिषद मालकीचे धोंडीबा आबाजी सातव उद्योग भवन तसेच यशवंतराव चव्हाण उद्योग भवन येथील १ लाख, ७४ हजार ९४० रुपये थकबाकी असणारे गाळे सील करण्यात आले आहेत.

तरी उर्वरित थकीत भाडे असणाऱ्या गाळेधारकांना थकीत व चालू रकमेचा भराणा तात्काळ करून गाळा सील व जप्त करण्याची व गाळ्याचा फेर लिलाव करण्याची कारवाई टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!