Varkari Accident : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत सांगलीतील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू…!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि.१४ जुलै २०२६.

  • सासवड-जेजुरी मार्गावर भरधाव टेम्पोने दिंडीतील वारकऱ्यांना दिली धडक.
  • भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, चारजण गंभीर जखमी.
  • घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
  • टेम्पो अनियंत्रित कसा झाला, याचा पोलिसांकडून तपास सुरू.

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सासवडहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मृत महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज दिंडीतील होत्या. मृत महिलांची नावे राजश्री शंकर भोसले (62) रा. कसबे डिग्रस, माधवी राजाराम सरवडे/सलगरे (55) रा. मालगाव आणि नंदा पवार (52) रा. कवलापूर अशी आहेत.

जखमी रुग्णांपैकी 2 गंभीर जखमींना ससून रुग्णालय पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 3 जणांना जेजुरी ग्रामीण रुग्णालय आणि 5 किरकोळ जखमींना आनंदी ट्रस्ट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दिंडीच्या सेवेसाठी साहित्य आणि जेवण घेऊन जाणाऱ्या ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिवदीप लॉजिंगसमोर हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

अपघातग्रस्त ट्रक MH 43 E 490 हा ताठे महाराज भोशीकर ता. कंधार, जि. नांदेड या दिंडीचा आहे. हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून चालक बालाजी एकनाथ डक (63) रा.पिंपळगाव ता. जि. नांदेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुरंरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय ट्रक चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्याने त्याला ग्लानी आल्याने हा अपघात घडला.

प्राथमिक तपासात संबंधित वारकरी हे प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गाऐवजी त्याबाहेरून चालत होते. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर वारी मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!